कटक :  दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्ट्रोक याला प्रेक्षकांनी तोंडावर बॉल मारला. प्रेक्षकांनी बॉल मारल्यावर बेन स्ट्रोक फारच भडकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कटक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या हार्दिक पांड्याने याने शानदार सिक्स लगावला. हा सिक्स अडविण्यासाठी बेन स्ट्रोकने उंच उडी मारली. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो जाहिरात बोर्डला जाऊन धडकला. 



स्ट्रोक सावरत नाही तोपर्यंत प्रेक्षकांकडे गेलाला बॉल प्रेक्षकांनी स्ट्रोकच्या दिशेने फेकला. तो सरळ स्ट्रोकच्या तोंडावर बसला. स्ट्रोक बेसावध असल्याने त्याला काहीच समजले नाही. त्याला लक्षात आले तेव्हा तो जबरदस्त भडकला. त्याने प्रेक्षकांना पाहून बडबड केली. पण कोणी चेंडू त्याने मारला हे समजले नाही. 


या घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा