नवी दिल्ली : कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय कबड्डी संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे की, संघ हा पाकिस्तानसोबत भेदभाव करत आहे.


जर दोन देशांमध्ये तणाव आहे तर दोन्ही देशांना बाहेर काढलं पाहिजे. कबड्डी वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान नसणं म्हणजे जसं फुटबॉल वर्ल्डकपमध्ये ब्राझिल नसल्यासारखं आहे. असं देखील पाकिस्तानने म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक धक्का बसला आहे.