मेलबर्न : तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच धूळ चारली आहे. याआधी 2005मध्ये पर्थच्या मैदानात पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानचा सहा विकेटनं विजय झाल्यामुळे पाच मॅचच्या सीरिजमध्ये आता पाकिस्ताननं बरोबरी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट सीरिजमध्ये व्हाईट वॉशची नामुष्की ओढावल्यानंतर ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्येही पाकिस्तानचा पराभव झाला होता. पण मेलबर्नमध्ये मात्र पाकिस्ताननं 14 बॉल राखून हा सामना जिंकला.


या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 220 रनमध्ये ऑलआऊट केलं. यानंतर 221 रनचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्ताननंही सावध सुरुवात केली. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हाफीजची हाफ सेंच्युरी, शोएब मलिकचे नाबाद 42 रनमुळे पाकिस्तानचा विजय सोपा झाला.