ढाका : आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक चांगलाच निराश झालाय. मात्र असे असले तरी फायनलमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेईल असे त्याला वाटते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत राहिली. पिचचा नीट अभ्यास न झाल्याने पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसल्याचे शोएब यावेळी म्हणाला. 


या पराभवानंतर केवळ फॅन्सच नाही तर पाकिस्तानची संपूर्ण टीम निराश झालीये. मात्र हा पराभव विसरुन फायनलमध्ये भारताला कसे हरवता येईल याचा आम्ही विचार करतोय, असेही शोएब म्हणाला.