मुंबई : विराट कोहलीनं मुंबईमध्ये घेतलेल्या 34 कोटी रुपयांच्या घराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनुष्काबरोबर वेळ घालवण्यासाठी विराटनं हे घर घेतल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचं हे घरं जेवढं मोठं आहे, तेवढ्याच या घरामध्ये वेगवेगळ्या सुविधाही आहेत. विराटचं हे घरं 7,717 स्क्वेअर फूट आहे.


 


विराट कोहलीच्या घरामध्ये 5 बेडरुम आहेत. या सगळ्या बेडरुमना वेगवेगळ्या प्रकारचं इंटिरियर करण्यात आलं आहे. 



या घराचं किचन बनवण्यासाठीही खास किचन तयार करण्यात आलं आहे.


 


विराट कोहलीचं मुंबईतलं हे घरं 35 व्या मजल्यावर आहे. तसंच विराटच्या घरातून बांद्रा-वरळी सी लिंकही दिसतो. या घराची सजावट विराट त्याचा आवडीनं करणार आहे.