प्लेईंग इलेव्हन आणि धडाकेबाज केदार जाधव
टीम इंडियाच्या धडाकेबाज खेळाडू केदार जाधवने पहिल्या वनडे सामन्यात सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं. केदार जाधवने आपल्या घऱच्या मैदानात धडाडीचं शतक लगावून सर्व फॅन्सना खूश केला.
मुंबई : टीम इंडियाच्या धडाकेबाज खेळाडू केदार जाधवने पहिल्या वनडे सामन्यात सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं. केदार जाधवने आपल्या घऱच्या मैदानात धडाडीचं शतक लगावून सर्व फॅन्सना खूश केला. यामुळे फॉर्मात असलेला केदार जाधवचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश असणं महत्वाचं आहे. पायाला क्रॅम्प आल्याने केदार जाधव दुखावला गेला होता.
टीम इंडियात शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, युवराज सिंह, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह यांचा प्लेईंग इलेव्हन समावेश होण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया एक शानदार फॉर्ममध्ये आहे, इंग्लंड विरोधात खेळाना टीम इंडियाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे, टेस्ट सिरीजमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर इंग्लंडची टीम पहिल्या वनडेतही पराभूत झाली.
इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली टीमने पहिल्यांदा शानदार प्रदर्शन केलं, आणि मोठा स्कोअर उभा केला, पण भारतीय बॅटसमनवर कंट्रोल करण्यासाठी यश आलं नाही, आणि इंग्लंडच्या टीमला पराभव पत्करावा लागला.
विराट कोहलीच्या टीमसमोर इंग्लंडचे बॉलर्स अगदी बेअसर ठरले. मात्र यावेळी टीम इंडियातही काही गोष्टींची कमी होती. हे पाहून टीम इंडियात वनडेसाठी या संभाव्य अकरा खेळाडूंना आजमावण्यात येऊ शकतं.