मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉईंटिंगला  वेस्ट इंडिजच्या ब्रॅयन लारापेक्षा सचिन तेंडुलकरअधिक सरस वाटतो, पण सर डॉन ब्रॅडमन हे सर्वोत्तम असल्याचंही पॉईंटिंगनं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तेंडुलकर इन विस्डन: ऍन ऍन्थॉलोजी' या पुस्तकासाठी पॉईंटिंगनं लेख लिहीला आहे. त्यामध्ये त्यानं सचिनचं कौतुक केलं आहे. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त कोणीही सिद्ध करु शकत नाही, ब्रॅन लारा मॅच विनर असला तरी ब्रॅडमन नंतर सचिनच ग्रेट आहे, असे गौरवोद्गार पॉईंटिंगनं काढले आहेत. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ष-दीड वर्ष उत्तम कामगिरी करून खेळाडू क्रमवारीत 1 नंबरवर पोहोचतात, पण सतत इतकी वर्ष उत्तम कामगिरी करणं सचिनलाच शक्य आहे, म्हणून तो महान आहे, असं ऑस्ट्रेलियाचा हा माजी कॅप्टन म्हणला आहे.


सचिनचं कौतुक करताना पॉईंटिगला त्याची सिडनी मैदानातून बघितलेली खेळी आठवते. 2003-04 साली सचिन खराब फॉर्ममधून जात होता. आणि त्यावेळच्या सिडनी टेस्टमध्ये एकही कव्हर ड्राईव्ह न खेळायचा निर्णय सचिननं घेतला होता. आपल्या 241 रनच्या या खेळीसाठी सचिननं 436 बॉल आणि 10 तास 13 मिनीटं घेतली, पण एकही कव्हर ड्राईव्ह मारायचा मोह त्याला झाला नाही. हाच त्याचा ग्रेटनेस आहे, अशी आठवण पॉईंटिगनं सांगितली.