कोलकाता : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताच्या पश्चिम मिदनापूरमधून या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. अटकेत असलेला 39 वर्षीय निर्मल्या सामांत हा एक वर्तमान विक्रेता आहे.


7 जानेवारी रोजी धमकी देणारं एक पत्र सौरव गांगुलीच्या घरी पाठवण्यात आलं होतं. या चिठ्ठीवर कुणाचंही नाव नव्हतं. यामध्ये सौरव गांगुलीला 19 जानेवारी रोजी विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, यासाठी धमकी देण्यात आली होती. 


सौरव गांगुलीच्या आईच्या नावानं ही चिठ्ठी पाठवण्यात आली होती. यावर, या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, यासाठी ही चेतावणी दिली जातेय. जर तो तिथे दिसला तर तुम्ही त्याला परत पाहू शकणार नाही, असं या चिठ्ठीत म्हटलं होतं. यानंतर सौरवनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 


सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा चेअरमन आहे. त्याला इंटर कॉलेज क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलसाठी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, मिदनापूर पोलिसांनी आरोपीला कोलकता पोलिसांच्या ताब्यात दिलंय.