रिओ ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं सिल्व्हर मेडल विकलं
पोलंडच्या पिओटर मालाहॉव्स्कीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये मिळवलेलं सिल्व्हर मेडलचा लिलाव केला आहे.
वॉरसॉ : पोलंडच्या पिओटर मालाहॉव्स्कीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये मिळवलेलं सिल्व्हर मेडलचा लिलाव केला आहे. एका कॅन्सरग्रस्त मुलाला मदत करण्यासाठी पिओटरनं हे पाऊल उचललं आहे.
पिओटरनं फेसबूकवरून ही माहिती दिली आहे. या मुलाच्या डोळ्याला गेल्या 2 वर्षांपासून कॅन्सर झाला आहे. या मुलावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करायचा आहे. या मुलाच्या आईकडे पैसे नसल्यामुळे तिनं माझ्याकडे मदत मागितली, त्यामुळे मी मेडल विकून मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं पिओटर म्हणाला आहे.