मुंबई : शालेय क्रिकेट स्तरावर नाबाद १००९ धावांची विक्रमी फलंदाजी करणाऱ्या प्रणव धनावडेने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


प्रणवनं काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंनी प्रणवच कौतुकही केलं होत. तेव्हा प्रणवने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.


राज ठाकरेंनी सचिनशी संपर्क केला आणि संवाद साधून प्रणवला भेटण्यासंबंधी चर्चा केली. सचिननंही प्रणवला भेटण्यासाठी ये असं सांगितंल. त्यानंतर प्रणवने सचिनची भेट घेतली. यावेळी सचिनने प्रणवला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.