रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. चेतेश्वर पुजाराची डबल सेंच्युरी आणि वृद्धीमान सहाच्या सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पहिल्या इनिंगमध्ये ६०३ रन्सचा डोंगर उभारत १५२ रन्सची आघाडी घेतली. ६०३/९ एवढा स्कोअर झाल्यावर भारतानं डाव घोषित केला. पुजारानं ५२५ बॉलमध्ये २०२ रन्सची तर सहानं २३३ बॉलमध्ये ११७ रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या ५ विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजानंही नाबाद ५४ रन्सची खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं २३ रन्सवर २ विकेट गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर १४ रनवर तर नाईट वॉचमन म्हणून आलेला नॅथन लायन २ रनवर आऊट झाला. या दोन्ही विकेट घेण्यात जडेजालाच यश आलं. ऑस्ट्रेलिया अजूनही १२९ रन्स पिछाडीवर आहे.