पुणे : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना रंगणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर हा सामना रंगेल. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघातील लढाई पुणेकरांना अनुभवता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 1 फेब्रुवारीपासून या मॅचच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. एमसीएची स्थापना झाल्यानंतर 82 वर्षांनी पुण्यात कसोटी सामना होतोय. नुकतंच पुण्यातल्या वनडे मॅचमध्ये शतकी खेळी करणा-या पुणेकर केदार जाधवला या ऐतिहासिक मॅचचं पहिलं तिकीट देण्यात आलंय. या मॅचसाठी 1 हजार ते 5 हजार रुपयांची तिकीटं उपलब्ध असणार आहेत.