मुंबई : पी.व्ही सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्स पदक जिंकल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. बॉलिवूडपासून, क्रिकेटर आणि नेत्यांनी देखील तिचं कौतूक केलं. यानंतर आता तिच्यावर बक्षीसांचा वर्षाव होण्यास सुरु झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्ष व्ही चामुंडेश्वरनाथ यांनी तिला BMW हा महागडी कार गिफ्ट करणार असल्याचं जाहीर केलं आहे.


हरियाणा सरकारने तिला याआधीच ४ कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. हैदराबादची रिअल इस्टेट कंपनीने सिंधूला फ्लॅट्स देण्याचं जाहीर केलं आहे.


भारत सरकार, तेलंगाना सरकार, दिल्ली सरकार, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, रेल्वे मिनिस्ट्री, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि बॉलिवूड अॅक्टर सलमान खानने देखील सिंधूला बक्षीस जाहीर केलं आहे.


फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनसोबत 2-1 ने पराभव झाल्यानंतर सिंधूला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. सिंधू ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी सगळ्यात कमी वयाची अॅथलीट बनली आहे.