मुंबई : बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.


या आधी क्वॉर्टरफाइनलमध्ये सिंधूने चीनची खेळाडू आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वांग यिहानला पराभूत केलं होतं. सिंधुचं सिल्वर मेडल पक्कं झालं आहे. आज जर सिंधू हा सामना जिंकतचे तर हे रियो ऑलिंपिकमधलं भारताचं पहिलं गोल्ड मेडल असेल.