मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानची मॉडेल अभिनेत्री कंदील बलोच चांगली चर्चेत राहिली. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या कंदीलने याबाबतच व्हिडीओही पोस्ट केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत तिने पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीवर तसेच पाकिस्तान संघावर जोरदार टीका केलीये. पाकिस्तानचा संघ जिंकल्यास स्ट्रिप डान्स करेल असे तिने म्हटले होते. 


आता पुन्हा कंदील चर्चेत आलीये याचे कारण विराट कोहली. कंदील चक्क विराट कोहलीच्या प्रेमात पडलीये आणि तिने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यात.