हैदराबाद : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला कालपासून सुरुवात झाली आहे. या मोसम सुरु होण्याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ओपनिंग सेरिमनीचा कार्यक्रम पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमावेळी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सेहवाग यांचा गौरव करण्यात आला. पण या खेळाडूंबरोबर राहुल द्रविड मात्र दिसला नाही. राहुल द्रविडच्या गैरहजेरीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण याबाबत आता बीसीसीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे.


राहुल द्रविड हा आयपीएलच्या दिल्लीच्या टीमचा कोच आहे. या कार्यक्रमासाठी द्रविड दिल्ली विमानतळावर दाखल झाला. पण दिल्लीमध्ये आलेल्या वादळामुळे विमानं रद्द करण्यात आली होती, यामुळे द्रविडला या कार्यक्रमाला उपस्थिती लावता आली नाही, असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.