कोलकाता: सगळ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड टी 20 मधल्या भारत-पाकिस्तान मॅचला आता अवघे काही तास उरले आहेत. पण त्याआधीच कोलकत्यामध्ये तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संध्याकाळीही असाच तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. दरम्यान हलका पाऊस पडला तरी मैदान पुन्हा नीट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती इडन गार्डन मैदानाच्या व्यवस्थापनानं दिली आहे. 


न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर, आता या स्पर्धेतलं आव्हान कायम टिकवून ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं अत्यंत आवश्यक आहे. पण पावसानंच खेळ केला तर मात्र भारतापुढच्या अडचणी वाढू शकतात.