अहमदाबाद : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला एका कंपनीने ६ लाखांचा चुना लावण्याची घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र जाडेजाच्या लग्नात त्याला ६ लाखांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या वरातीतल्या गोळीबारामुळे त्याचं लग्न विशेष चर्चेत आलं होतं. 


या शाही विवाहसोहळ्यासाठी अहमदाबादच्या 'अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी'सोबत ११ लाखांचं कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं होतं.  रवींद्र जाडेजाचं लग्न १७ एप्रिल रोजी झालं. 


मात्र कंपनीचे मॅनेजर श्याम त्रिवेदी, केवल पटेल आणि उर्वी बावरिया यांनी जडेजा कुटुबीयांना अपेक्षित काम न केल्याने रवींद्र जाडेजाच्या बहिणीने पोलिसांत तक्रार केली आहे. त्याच्या बहिणीनं लग्नाच्या आयोजनाचं काम दुसऱ्या कंपनीला दिलं होतं.


जडेजाचं लग्न होऊन ४ महिने उलटल्यानंतरही अहमदाबादच्या 'अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी'ला अॅडव्हान्स म्हणून देण्यात आलेले, ६ लाख रुपये जाडेजाला परत मिळाले नाहीत.


लग्नाला ४ महिने उलटल्यानंतरही कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. तसेच जे करायचंय ते करा, पण आम्ही पैसे परत देणार नाही, अशी धमकीही दिल्याची माहिती रवींद्र जडेजाच्या बहिणीनं दिली आहे.


बहीण नयनाबा जाडेजाने लग्नाच्या व्हिडीओग्राफीसह सर्व कार्यक्रमांसाठी अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला ११ लाख रुपयांमध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं ठरलं होतं.