जडेजाच्या या कामगिरीने भारत पुन्हा जिंकणार?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या त्रिकुटाने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
मोहाली : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या त्रिकुटाने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
भारताने पहिल्या डावात 417 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 78 धावा केल्या. इंग्लंड अद्यापही 56 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 90 धावांची खेळी करताना भारताचा विजयाचा मार्ग जवळपास निश्चित केलाय. आकडेवारीही हेच सांगते. जेव्हा जेव्हा कसोटीत जडेजाने 34 हून अधिक धावा केल्यात तेव्हा प्रत्येक सामन्यात भारत जिंकलाय. त्यामुळे जडेजाच्या 90 धावांमुळे टीम इंडिया जिंकण्याच्या आशा वाढल्यात.