नवी दिल्ली : टीम इंडियानं जिंकलेल्या मॅचनंतर धोनी प्रत्येक मॅचमध्ये स्टम्प उचलून घेऊन जाताना दिसतो. तो असं का करतो हा अनेक जणांना पडलेला प्रश्न...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिटायरमेंट घेतल्यानंतरचं हे माझं काम आहे... मी कोणत्याही स्टम्पवर खुणा केलेल्या नाहीत. रिटायर झाल्यानंतर मी स्टम्प आणि जिंकलेल्या मॅच असं गणित करत बसणार आहे, असं तो गंमतीनं म्हणतो.


विनिंग स्टम्प आणि मैत्री


पण, यामागे आणखीही एक भावनिक कारण आहे. धोनीचा एक मित्र आहे... कुलबिंदर... एका नेपाळी वॉचमनचा हा मुलगा... यानंच धोनीला क्रिकेट खेळण्यासाठी उद्युक्त केलं आणि प्रोत्साहन दिलं. आता धोनी क्रिकेटचा सुपरस्टार बनलाय... पण, कुलबिंदरला मात्र म्हणावं तसं यश मिळालं नाही.


कुलबिंदरनं आपलं एक घरटंही बांधलं... यासाठी त्यानं धोनीनं देऊ केलेली आर्थिक मदत त्यानं नाकारली... फक्त एकच गोष्ट त्याला अपेक्षित आहे... ३२० स्टम्प्स... होय, याच स्टम्पच्या साहाय्यानं त्याला आपल्या घराभोवती छानसं कुंपण उभारायचंय... आणि त्यासाठीच धोनीचा हा खटाटोप सुरू आहे. 


म्हणजेच, टीम इंडियानं जिंकलेल्या प्रत्येक मॅचमुळे कुलबिंदरच्या घरासाठी एक स्टम्प मिळणार आहे, हीच धोनीची आपल्या मित्रासाठी भेट असेल.