नागपूर : टी-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवाचा सिलसिला टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातही कारण राहिला. आशिया कप जेतेपदामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला सलामीच्या सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही आहेत भारताच्या पराभवाची कारणे


भारताच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे टॉस हरणे. टॉसमध्ये न्यूझीलंडने यश मिळवले आणि सुरुवातीला फ्रंटफुटमध्ये आली. 


नागपूरची खेळपट्टी फलंदाजांना साथ देईल असे वाटले होते. मात्र घडले उलटेच. गेल्या वर्षीही नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा कसोटी सामना तीन दिवसांतच आटोपला होता.  


सलामीवीरांच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. शिखर धवन एक आणि रोहित शर्मा केवळ ५ धावा करुन बाद झाले. 


भारतीय संघाने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले मात्र फलंदाजीत ते साफ अपयशी ठरले. सुरेश रैना, विराट कोहली, युवराज सिंह हे भरवशाचे फलंदाज खराब शॉट खेळण्याच्या नादात लवकर बाद झाले. 


नागपूरच्या मैदानावर न्यूझीलंडच्या स्पिनर्सनी कमाल केली.