मुंबई: मुंबईतल्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमनं आत्तापर्यंत क्रिकेटमधले अनेक विक्रम पाहिले. आजही असाच एक विक्रम या मैदानात झाला आहे. इराणी ट्रॉफीमध्ये रेस्ट ऑफ इंडियानं 480 रनचं डोंगराएवढं लक्ष्य पार केलं आहे, आणि इराणी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इराणी करंडकाच्या इतिहासामधील हा सगळ्यात यशस्वी पाठलाग आहे. याआधी रेस्ट ऑफ इंडियानं 1982-83मध्ये दिल्लीविरुद्ध 424 रनचा यशस्वी पाठलाग केला होता. जगभरातल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधला हा दहावा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. 


फैज फैजल, करुण नायर आणि स्टुअर्ट बिनी या तिघांनी रेस्ट ऑफ इंडियाचा विजय निश्चित केला, आणि मुंबईचं इराणी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधूरं राहिलं. इराणी ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत मुंबईला 8 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1997-98 मध्ये मुंबईनं शेवटची इराणी ट्रॉफी जिंकली होती. 


480 रनचा पाठलाग करताना फैज फजलनं शानदार सेंच्युरी लगावली. तर करुण नायर, स्टुअर्ट बिनी आणि शेल्डन जॅकसननं हाफ सेंच्युरी केली. बिनी आणि जॅकसननं सहाव्या विकेटसाठी 92 रनची पार्टनरशिप केली, आणि त्यानंतर तळाच्या बॅट्समननी रेस्ट ऑफ इंडियाला 480 रनपर्यंत पोहोचवलं.