भुवनेश्वर कुमार - अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग, भुवीचे स्पष्टीकरण
![भुवनेश्वर कुमार - अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग, भुवीचे स्पष्टीकरण भुवनेश्वर कुमार - अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग, भुवीचे स्पष्टीकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/05/20/228723-bhuvi-anusmriti.jpg?itok=mR3k4uhj)
टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमार यांचा क्लिन बोल्ड अभिनेत्री अनुश्रमी सरकार हिने केल्याचे वृत्त जोरदार आहे. ते दोघे डेटिंग करत असल्याचे सांगितले आहे.
मुंबई : टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमार यांचा क्लिन बोल्ड अभिनेत्री अनुश्रमी सरकार हिने केल्याचे वृत्त जोरदार आहे. ते दोघे डेटिंग करत असल्याचे सांगितले आहे.
शुक्रवारी रात्री टॉलीवूड स्टार अभिनेत्री अनुश्रमी सरकारसोबत भुवी लंचला गेला होता. त्याला अनेकांनी तिच्यासोबत पाहिले, त्यामुळे डेटिंगमध्ये तथ्य असल्याला दुजोरा मिळाला.
भुवनेश्वर कुमार सध्या इंडियन प्रीमियर लीग २०१७ मध्ये चांगलाच चमकलाय. तो सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. या बॉलरने एक इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकलेय. त्यामुळे दक्षिण अभिनेत्री आणि मॉडेल अनुश्रमीसोबत डेट करत असल्याचे त्यात अधिक भर पडली.
मात्र, याबाबत त्यांने इन्कार केलाय. योग्यवेळी मी लग्नाबाबत बोलेन, असे सांगून भुवीने यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ही अफवा असल्याचे सांगितले जात आहे.