रिओ : ऑलिम्पिमध्ये भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिग गटात चांगली सुरुवात केली आहे.  सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांनी रिओ स्पर्धेत पहिला विजय संपादन केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पी.व्ही.सिंधू हिने हंगेरीच्या लॉरा सॅरोसी हिच्यावर २१-८, २१-९ असा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर सायना नेहवाल आणि एन.व्हिन्सेंट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सायनाने २१-१७, २१-१७ असा जिंकला. 


रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात अद्याप एकही पदक जमा झालेले नाही. तिरंदाजी, नेमबाजी, टेनिसमध्ये भारताच्या हाती निराशा लागली आहे. त्यामुळे आता बॅडमिंटनमध्ये भारताला पदकाची आशा आहे. 


दुसरीकडे, महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने निराशा केली असून, त्यांचा पहिल्याच सामन्यात २१-१५, २१-१० असा लाजिरवाणा पराभव झाला. जपानच्या  एम.मात्सुटोमो आणि ए.तकाहाकी जोडीने भारताच्या ज्वाला-पोनप्पा जोडीवर सहज मात केली.