मास्टर ब्लास्टर बनला रिओ ऑलिम्पिकचा तिसरा सदिच्छा दूत
रिओ ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत बनण्याचं निमंत्रण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्वीकार केलंय.
नवी दिल्ली : रिओ ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत बनण्याचं निमंत्रण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्वीकार केलंय.
सचिन तेंडुलकर हा अभिनेता सलमान खान आणि नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर सदिच्छा दूत बनणारा तिसरा व्यक्ती ठरलाय.
भारतीय ऑलिम्पिक संघानं (आयओए) ही घोषणा केलीय. राष्ट्रीय ऑलिम्पिक संस्थेनं २९ एप्रिल रोजी तेंडुलकरला सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली होती. यानंतर सचिननं आमची ही मागणी स्वीकारलीय, असं आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी म्हटलंय.
सलमानच्या निवडीचा वाद
सलमान खानच्या निवडीवरून वाद निर्माण झाल्यानंतर आयओएने आम्ही अजूनही काही जणांना 'सदिच्छा दूत' करणार आहोत, अशी भूमिका जाहीर केली होती.