पुणे :  आयपीएल सीझन २०१७ च्या पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात त्याने एक ट्विट करून स्टीवचे कौतुक केले आहे. तसेच महेंद्र सिंग धोनीच्या ऐवजी स्टीव स्मिथला कर्णधारपद सोपविल्याच्या आपल्या निर्णयाला योग्य ठऱवले आहे. 


हर्ष गोयंका रायझिंग पुणे सुपरजाएंटचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ आहे. हर्षने या ट्विटमध्ये महेंद्रसिंग दोनी यांच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 


पुण्याने मुंबईला हरविल्यानंतर काही वेळातच हर्ष गोयंका याचे ट्विट आले. मुंबईने पुण्यासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण स्टिव स्मिथच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर तीन गडी राखून पुण्याने विजय मिळविला.. 


धोनीच्या ऐवजी स्मिथला कर्णधार करण्याचा निर्णय योग्य होता. त्याने कर्णधाराला साजेलशी कामगिरी केली. आमच्या निर्णय योग्य होता. स्मिथने सिद्ध केले की जंगलचा राजा कोण आहे. धोनीला आपल्या कामगिरीने संपूर्णपणे झाकोळून टाकले असेही म्हटले आहे.