पुण्याचा पंजाबवर दणदणीत विजय
बाद फेरीचे लक्ष्य बाळगलेल्या पुण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवलाय.
पुणे : बाद फेरीचे लक्ष्य बाळगलेल्या पुण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवलाय.
पंजाबचा डाव 73 धावांच गुंडाळल्यानंतर पुण्याने हे सोपे आव्हान 9 विकेट राखून पूर्ण केले आणि दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला.
बाद फेरीत प्रवेश मिळवण्याचे मात्र पंजाबचे स्वप्न भंगले. दोन्ही संघांसाठी हा करो वा मरो सामना होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 15.5 षटकांत 73 धावा केल्या.
पंजाबच्या केवळ 4 फलंदाजांना दुहेरी धावा करता आल्या. सर्वाधिक धावा 22 अक्षर पटेलने केल्या. पुण्याने अवघ्या 12 षटकांत हे आव्हान पूर्ण करत विजय मिळवला.