पुणे : पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये केकेआरचा विकेटकीपर रॉबिन उथप्पानं महेंद्रसिंग धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. विकेटकिपींग करत असताना उथप्पानं पुण्याच्या तीन बॅट्समनना स्टम्पिंग केलं. आयपीएलमध्ये एकाच मॅचमध्ये तीन बॅट्समनना स्टम्पिंग करण्याच्या धोनीच्या या रेकॉर्डशी उथप्पानं बरोबरी केली आहे. याआधी धोनीनं आयपीएलमध्ये दोनदा तीन बॅट्समनना स्टम्पिंग केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये उथप्पानं अजिंक्य रहाणे, धोनी आणि मनोज तिवारीला स्टम्पिंग केलं. विकेटकिपींग बरोबरच उथप्पानं बॅटिंगमध्येही दमदार कामगिरी करत केकेआरला विजय मिळवून दिला. उथप्पानं ४७ बॉल्समध्ये ८७ रन्स केल्या. उथप्पाच्या या खेळीमध्ये ७ फोर आणि ६ सिक्सचा समावेश होता.