मुंबई : टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची नेमणूक करण्यासाठी ५७ अर्जदारांपैकी २१ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अजय शिर्के यांनी ही यादी तयार केली असून यातल्या एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.


ही २१ जणांची यादी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या तीन सदस्यीय उच्च स्तरीय सल्लागार समितीकडे पाठवण्यात येणार आहे. या निवडसाठी बीसीसीआयचे माजी सचिव आणि निवड समितीचे सदस्य संजय जगदाळे संयोजनाचं काम करणार आहेत. 


ही समिती २२ जूनपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याकडे अंतिम अहवाल सादर करणार आहे. प्रशिक्षकपदासाठी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर आहे.