हैदराबाद : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरचा मित्र आणि हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांच्या तर्फे आज या चौघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या चौघांना ही आलीशान गाडी भेट देण्यात आली.


यावेळी साक्षी मलिकने आपण सचिनची चाहती असल्याचे सांगत त्याच्यासोबत सेल्फीही काढली. सचिन हा रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचा गुडविल अॅम्बेसिडर होता.