भारतीय कसोटी टीमला सचिनची नवी सूचना
या सूचनेनंतर सचिननं भारतीय टेस्ट टीमला परेदशातील वातारवणात खेळण्याचं आव्हान पेलण्यासाठी एक नवी सूचना केली आहे.
मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आता अजून एक नवी सूचना केली आहे. शालेय पातळीवर लास्ट इलेव्हनमध्ये 11 ऐवजी 14 खेळाडू एका टीममध्ये असावेत. या सूचनेनंतर सचिननं भारतीय टेस्ट टीमला परेदशातील वातारवणात खेळण्याचं आव्हान पेलण्यासाठी एक नवी सूचना केली आहे.
सचिन तेंडुलकरनं काही सूचना केली तर ती दुर्लक्षित करुन चालणार नाही, अथवा त्याच्या सूचनांची क्रिकेट जगतात प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहत नाही. परदेशी भूमीवर जर भारतीय टीमची कामगिरी उंचवावी असं वाटत असेल तर रणजी स्पर्धांमधील लढती या दोन पिचेसवर खेळवण्यात याव्यात असं सचिननं म्हटलंय.
याखेरीज रणजीमधील लढती या तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यात याव्यात. तसंच रणजी स्पर्धेत एसजी बॉलचा वापर केल्यास युवा क्रिकेटपटूना परदेशात स्विंग होणा-या कुकाबुरा बॉलचा सामना करणं सोप जाईल अशी सूचना सचिननं केली असून क्रिकेट जगतात या सूचनांचं स्वागत केलं जातंय.
ग्रीन टॉप आणि स्पिनर फ्रेंडली पिच अशा दोन पिचेसवर एक-एक इनिंग खेळवण्यात यावी तसंच दुसरी इनिंग ही एसजी बॉलनं खेळवण्यात यावी यामुळे बॅट्समनला दर्जेदार फिरकी बॉलविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. सचिनच्या या सूचना नक्कीच फायदेशीर ठरतील.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलरकच्या या सूचनांची बीसीसीआयनं लवकरात लवकर अमंलबजावणी केल्यास त्याचा भारतीय क्रिकटे टीमला फायदाच होणार आहे.