दत्तक घेतलेल्या गावाला सचिन तेंडुलकरची भेट
भारत रत्न सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट देऊन पाहाणी केली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे.
हैदराबाद : भारत रत्न सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट देऊन पाहाणी केली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे.
सचिनने यावेळी कंद्रिका गावाला दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आंध्र प्रदेशमधील नेल्लोरे जिल्ह्यातील कंद्रिका गावातील कामे सचिनच्या खासदार निधीतून अनेक कामे झाली आहेत.
सचिनने हे गाव नोव्हेंबर २०१४ मध्ये दत्तक घेतले. या गावात फलोत्पादन, मासेमारी आणि पशूसंवर्धन यावर ग्रामस्थांचा उदरनिर्वाह चालतो. हे गाव दत्तक घेण्यापूर्वी गावात संपूर्ण अंधार होता. मात्र आता गावात २४ तास वीज उपलब्ध आहे. दोन वर्षांआधी कंद्रिका गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र, आता व्यवस्थित पाणी पुरवठा होत आहे. गावातील प्रत्येक घरात पाण्याचा मीटरदेखील आहे.