नवी दिल्ली : युवा क्रिकेटपटूंसाठी सचिन नेहमीच मदतीचा एक हात पुढे करत असतो. त्यांना सतत चीअर अप करत असतो. भारतीय संघात सध्या चांगली कामगिरी करत असलेल्या हार्दिक पांड्याबद्दल गेल्या वर्षी सचिनने एक भविष्यवाणी केली होती आणि चक्क ती खरीही ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगदरम्यान सचिनने पुढील १२ महिन्यांत मी भारतासाठी खेळेन असे सांगितले होते. मात्र अवघ्या सात महिन्यांतच मला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. 


२२ वर्षीय पांड्याने पदार्पणानंतर ११ टी-२० सामन्यात १० विकेट मिळवलेत. तर पाच डावांत ६२ धावाही केल्यात. सध्या ऑलराऊंडर म्हणून संघात त्याचे स्थान महत्त्वाचे झालेय. 


पंड्याचा क्रिकेटमधील रोल मॉडेल आहे दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस. पंड्या नेहमी त्याच्या शैलीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला इंडियन टीमचा जॅक कॅलिस बनायचेय.