मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधले जवळपास सगळेच विक्रम केले आहेत. सचिनच्या कारकिर्दीमधल्या अनेक इनिंग क्रिकेट रसिकांच्या आजही लक्षात आहेत. शाहरजाहमधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही इनिंगही त्यातलीच एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरजाहमध्ये या मॅचदरम्यान दोन वादळं आली. एक नैसर्गिक वादळ आणि दुसरं सचिनचं. कांगारू बॉलर्सना लोळवत सचिननं 131 बॉलमध्ये 143 रनची अफलातून इनिंग खेळली.


या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला जिंकण्यासाठी 285 रनचं टार्गेट ठेवलं. पण फायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी भारताला या मॅचमध्ये 254 रनची गरज होती. सचिनच्या या वादळी खेळीनंतरही भारतानं मॅच 26 रननी गमावली तरी याच इनिंगमुळे भारत फायनलमध्ये पोहोचला. 


पाहा सचिनची ती वादळी खेळी