नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी टूर्नामेंटमध्ये सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. तर सिंधुने जपानच्या सेइना कावाकामीचा पराभव करत आपली जागा पक्की केली.


भारताच्या या दोन्ही दिग्गज महिला खेळाडू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधु आता क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांसमोर असणार आहेत. आता या दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये सामना रंगणार आहे.