सायनाला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद
भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे जेतेपद जिंकताना यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवलीये.
सिडनी : भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे जेतेपद जिंकताना यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवलीये.
महिला एकेरीत अंतिम सामन्यात तिने चीनच्या सून यूचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा तीन गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये सून यूने सायनाला निष्प्रभ ठरवले. मात्र जिंकण्याच्या इराद्याने कोर्टात उतरलेल्या सायनाने पुढील सलग दोन गेम जिंकत जेतेपद मिळवले. तिसऱ्या गेममध्ये सून यूने सायनाला कडवी लढत दिली.
सायनाचे हे दुसरे ऑस्ट्रेलियन जेतेपद आहे. आगामी रिओ ऑलिंपिक स्पर्धेआधी तिने मिळवलेले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद तिचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.