ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
सायना नेहवाल, आणि पी व्ही सिंधू यांनी ऑल इंग्लंड बॅटमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलीय. पुरुषांच्या गटात मात्र भारताच्या केदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय यांचा पराभव झालाय.
नवी दिल्ली : सायना नेहवाल, आणि पी व्ही सिंधू यांनी ऑल इंग्लंड बॅटमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलीय. पुरुषांच्या गटात मात्र भारताच्या केदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय यांचा पराभव झालाय.
सहाव्या मानांकित सिंधूनं इडोनेशियन दिनार दायह ऑयुस्टीनवर मात केली. तर सायनानं जर्मनीच्या फॅबिनय डिप्रेजरचा दोन गेममध्ये सरळ मात केली. ऑल इंग्लंड बॅटमिंटनही जगातली अत्यंत महत्वाची स्पर्धा मानली जाते.
ऑलिम्पिकमध्ये फारसा प्रभाव टाकू न शकलेल्या सायना नेहवालनं त्यानंतर प्रभावी कामगिरी केलीय. आता यास्पर्धेत तिच्या कामगिरीकडे बॅटमिंटन विश्वाचे डोळे लागले आहेत. पीव्ही सिंधूही या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणं ही करियरच्या दृष्टीनं एक महत्वाचा टप्पा असणार आहे.