मुंबई : आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला. यावर धोनीच्या पत्नीने नाव न घेता हर्ष यांच्यावर निशाना साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षीने सोमवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये लिहिलं होतं की, 'कर्माचे नियम'


''जेव्हा पक्षी जिंवत असतो तो मुंग्या खातो. पक्षी मेल्यानंतर त्यालाच मुंग्या लागतात. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे कोणाला कधी खालीपणा नाही दाखवला पाहिजे आणि कोणाला दुखवलं ही नाही पाहिजे. आज तुम्ही बलवान आहात पण वेळ तुमच्यापेक्षा अधिक बलवान असते. एका झाडापासून लाखो माचिस बनतात. एक माचिसची काडी झाला खाक करुन टाकते. त्यामुळे चांगलं बना आणि चांगलं करा.'


हर्ष यांनी ट्विट करत म्हटलं, 'धोनीच्या ऐवजी स्मिथला कर्णधार करण्याचा निर्णय योग्य होता. त्याने कर्णधाराला साजेलशी कामगिरी केली. आमच्या निर्णय योग्य होता. स्मिथने सिद्ध केले की जंगलचा राजा कोण आहे. धोनीला आपल्या कामगिरीने संपूर्णपणे झाकोळून टाकले.' पण काही वेळानंतर त्यांनी हे टविट डिलीट केले.


हर्ष यांच्या या ट्विट नंतर धोनीचे फॅन्स त्यांच्यावर चांगलेच भडकले.