रिओमध्ये या खेळाडूने रचला इतिहास, बुरखा घालून शर्यतीत घेतला भाग
रिओमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात अनेक खेळाडू इतिहास रचतायत. तर पदकांची लयलूट सुरु आहे. मात्र यादरम्यान एका अॅथलीटने पदक मिळवण्याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीने इतिहास रचलाय.
रिओ : रिओमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात अनेक खेळाडू इतिहास रचतायत. तर पदकांची लयलूट सुरु आहे. मात्र यादरम्यान एका अॅथलीटने पदक मिळवण्याच्याऐवजी वेगळ्या पद्धतीने इतिहास रचलाय.
ऑलिम्पिकच्या सातव्या दिवसी सौदीची धावपटू करीमन अबुलजदायलने इतिहास रचला. १०० मीटर धावण्याच्या प्रकारात भाग घेणारी ती सौदी अरेबियाची पहिली महिला ठरली.
२२ वर्षीय करीमन या स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिली त्यामुळे ती फायनलसाठी पात्र ठरु शकली नाही. करीमनने यावेळी संपूर्ण बुरखा घातला होता. तिच्या या प्रयत्नासाठी सोशल मीडियावर ती कौतुकास पात्र ठरलीये. करीमनच्या आधी एका अॅथलिटने बुरखा घालून स्पर्धा खेळली होती.
सौदीच्या ऑलिम्पिक समितीने २०१२मध्ये महिलांना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली. दरम्यान, या बंदीवर समाजातील सर्वच स्तरातून विरोध करण्यात आला.