नागपूर: आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफाईंग राऊंडच्या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं स्कॉटलंडचा 11 रननी पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वेनं दिलेल्या 147 रनचा पाठलाग करताना स्कॉटलंडला 136 रनपर्यंत मजल मारता आली. स्कॉटलंडची टीम त्यांच्या इनिंगचे 2 बॉल बाकी असतानाच ऑल आऊट झाली. 


रिची बेरिंगटनच्या 36 रन आणि कॅप्टन प्रिस्टन मोमसेनच्या 27 बॉलमध्ये 31 रननी स्कॉटलंडच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या पण त्यांचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. 


टॉस जिंकून झिम्बाब्वेनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेकडून सिन विलियम्सनं 36 बॉलमध्ये 53 रन केल्या. तर एल्टन चिगंबुरानं झटपट 20 रन करून झिम्बाब्वेला 146 रनपर्यंत पोहोचवलं. 


झिम्बाब्वेनं आत्तापर्यंत 2 मॅचमध्ये 2 विजय मिळवत 4 पॉईंट्स कमावले आहेत. त्यामुळे पुढच्या स्टेजमध्ये जायचा त्यांचा मार्ग आणखी सोपा झाला आहे.