मुंबई : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी याची ओळख आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात अनेक सामने भारताला जिंकून दिले आहे. धोनीची कॅप्टनसीची चर्चा क्रिकेट विश्वात असते. धोनी कधी कोणता निर्णय घेईल हे इतरांना ही कधीच माहित पडत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीची एक असंच गुपीत आहे जे इतर संघाला तर सोडा पण भारतीय संघाच्या खेळाडूंना देखील कळाले नाही. धोनीच्या जीवनात एक मुलगी आहे हे कोणालाच कळालं नाही. दीपिका पदुकोनचं नाव धोनीसोबत जोडलं गेलं पण हे सपशेल खोटं ठरलं.


धोनी साक्षीसोबत डेटींग करत होता आणि तो तिला लग्नाआधी ऑस्ट्रेलियालाही घेऊन गेला होता याची जराही भणक कोणालाच लागली नाही. धोनीच्या जीवनात साक्षी आहे हे कोणालाच माहित नव्हतं. धोनीने साक्षीला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली होती. ६ फेब्रवारी २०१० मध्ये हे दोघे विवाहबध्द झाले होते.