कटक : कटक वन-डेमध्ये युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली. धोनी-युवीच्या झंझावती इनिंगसमोर इंग्लिश बॉलर्सनी अक्षरक्ष: नांगी टाकली. या दोघांनी 256 रन्सची पार्टनरशिप करत पाहुण्या टीमला चांगला तडाखा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या वन-डेत विराट कोहली आणि केदार जाधवनं पाहुण्या टीमला सळो की, पळो करून सोडलं होतं. तर कटकमध्ये युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या तडाख्यात ईयॉन मॉर्गनची टीम अशी काही अडकली की शेवटपर्यंत धोनी-युवराज हे कोडं त्यांना उलगडता आलं नाही. ब-याच दिवसांनी क्रिकेटप्रेमींनी फिअरलेस युवराजला मनमुराद बॅटिंगचा आनंद लुटताना पाहिलं. त्यानं इंग्लिश बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली. आणि त्याला साथ मिळाली ती त्याचा जुना फेव्हरिट बॅटिंग पार्टनर महेंद्रसिंग धोनीची.


युवराजच्या या तडाखेबंद खेळीनंतर सेहवागने युवराजबाबत ट्विटवर हृदयस्पर्शी मेसेज पोस्ट केला. या माणसाने कॅन्सरला हरवले. त्यानंतर त्याने इंग्लिश गोलंदाजांना हरवले. प्रयत्नांची कास सोडू नका हे याच्याकडून प्रत्येकाने शिकले पाहिजे. युवराज तुझा अभिमान वाटतो, असे सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.