पेशावर : सध्या माझा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं वक्तव्य पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं केलं आहे. दुबईमध्ये निरोपाचा सामना खेळवण्यासाठी आफ्रिदीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला साकडं घातल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्या आफ्रिदीनं फेटाळून लावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 20 वर्षांपासून मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी नाही तर पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळत आहे. मॅच खेळवण्यासाठी मी कोणावरही अवलंबून नाही. माझ्या फॅन्सनी दिलेलं प्रेमच माझ्यासाठी बक्षिस असल्याचं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. निरोपाची मॅच खेळवण्यासाठी मी पीसीबीकडे कधीच मागणी करणार नसल्याचंही आफ्रिदीनं स्पष्ट केलं आहे.