मुंबई: ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर शेन वॉटसन टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर रिटायर होणार आहे. 14 वर्षांपूर्वी याच दिवशी वॉटसन ऑस्ट्रेलियाकडून पहिल्यांदा खेळला होता, आणि याच दिवशी त्यानं आपण रिटायर होत असल्याचं घोषित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी ऍशेस सीरिज संपल्यानंतर वॉटसननं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होती. तर मागच्या वर्षी सप्टेंबरनंतर वॉटसन एकही वनडे खेळलेला नाही.


यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान आणि भारताबरोबर मॅच राहिल्या आहेत.


सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. यातली एक मॅच ऑस्ट्रेलिया हारली, तर कदाचित भारताविरुद्धची मॅच वॉटसनची शेवटची मॅच ठरु शकते.