मुंबई: बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे आपल्या पदाचा राजीनामा द्यायची शक्यता आहे. शशांक मनोहर हे आयसीसीचे चेअरमन होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीचं चेअरमन व्हायचं असलेल्या व्यक्तीनं क्रिकेटमधल्या दुसऱ्या कोणत्याही पदावर असता कामा नये, असा नियम केला आहे, त्यामुळे शशांक मनोहर हे बीसीसीआयचा राजीनामा देऊ शकतात. 


शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला तर शरद पवार पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे.