आयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार
आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.
मुंबई : आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.
शिविलने भारतातील कोणत्याही टीमसोबत करार केलेला नाही. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये त्याला संधी मिळाली आणि नंतर त्याच्या कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये १० लाखांना गुजरातने घेतलं.
यॉर्कशायर प्रीमियर लीगच्या १४२ वर्ष जुना क्रिकेट क्लब हॉल सीसीसीसोबत करार केला आहे. तो पुढच्या आठवड्यात इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. क्लबने म्हटलं आहे की, 'शिविल लवकरच आमच्यासोबत असणार आहे. तो आमच्यासोबत जोडला जाणार असल्याने उत्साहित आहोत. आम्ही आयपीएलमध्ये त्याची कामगिरी पाहिली आहे. त्याच्यापासून आम्हाला आशा आहेत.