रिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. साक्षी मलिकला पदक मिळाल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेखिका शोभा डे यांनीही ट्विटरवरून साक्षी मलिकला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला रिओमधलं पहिलं मेडल महिलेनं दिलं. साक्षी मलिकला शुभेच्छा, असं ट्विट शोभा डेंनी केलं आहे. 


रिओ जाओ, सेल्फी लो, खाली हाथ वापस आओ. पैसे आणि वेळेची ही बरबादी आहे, असं काहीच दिवसांपूर्वी शोभा डे म्हणाल्या होत्या. या वक्तव्यामुळे शोभा डेंवर जोरदार टीका झाली होती.