मुंबई इंडियन्ससाठी गूड न्यूज आणि बॅड न्यूज
आयपीएलच्या सुरवातीलाच मुंबई इंडियन्सना धक्का बसला आहे.
मुंबई: आयपीएलच्या सुरवातीलाच मुंबई इंडियन्सना धक्का बसला आहे. मुंबईचा ओपनिंग बॅट्समन लिएंडल सिमन्स पाठीच्या दुखण्यामुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. सिमन्सऐवजी न्यूझिलंडचा बॅट्समन मार्टिन गप्टिल आता मुंबईकडून खेळणार आहे.
आयपीएलच्या लिलावामध्ये मार्टिन गप्टिलला कोणत्याच संघानं विकत घेतलं नव्हतं. पण आता गप्टिलला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.
2015 ला मुंबईनं आयपीएल जिंकली तेव्हा सिमन्सनं महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मागच्या वर्षी सिमन्सनं 13 मॅचमध्ये 540 रन केल्या होत्या. तर यंदाच्या मोसमात पुण्याविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये सिमन्स फक्त 8 रनवर आऊट झाला होता.