बर्मिघंम : भारताच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पर्धेत सहावे मानांकन मिळालेल्या सिंधूने बुधवारी पहिल्या फेरीत डेन्मार्कची खेळाडू मेट पाउल्सन हिचा २१-१०, २१-११ असा पराभव केला. अर्ध्या तासाच्या आत तिने दुसऱ्या फेरीतील प्रवेश नक्की केला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या दिनार ऑस्टिनशी होईल.


तर दुसरीकडे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनानेही गतविजेती नोझुमी ओकुहाराला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला. तिने ओकुहाराला २१-१५, २१-१४ असं नमवलं. 


त्यासोबतच पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयने कायो बिनला १७-२१ ,२२-२० आणि २१-१९ ने पराभूत करून तो दुसऱ्या फेरीत पोहोचला.