मुंबई : रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर रवी शास्त्रीनं उघड नाराजी व्यक्त केली. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांनी कोच होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. माझ्या मुलाखतीवेळी गांगुली उपस्थित का नव्हता असा सवाल रवी शास्त्रीनं उपस्थित केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्रीच्या या वक्तव्यावर आता सौरव गांगुलीनंही प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही घेतलेल्या मुलाखती या अत्यंत गोपनिय होत्या. त्यामुळे शास्त्रीनं केलेल्या वक्तव्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही असं गांगुली म्हणाला आहे. 


शास्त्रीची मुलाखत पाच ते सहा या वेळेत ताज बंगाल या हॉटेलमध्ये झाली. त्यावेळी मी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या बैठकीला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली आहे.